नृत्य हा माझा छंद आहे आणि अभिनय
हे प्रोफेशन. - स्मिता शेवाळे
'यंदा कर्तव्य आहे' ह्या चित्रपटातून तिने या मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.
शांता शेळके, मृणाल कुलकर्णी यांच्या सारखीच ती सुद्धा पुण्याच्या हुजुरपागा आणि स.
प. महाविद्यालयाची विद्यार्थीनी. नृत्याची आवड तिला आधीपासूनच. शाळेत असतानाच
डान्सची कोणतीही संधी सोडली नाही. इतर मुलींसारखीच ती सुद्धा शाळेच गॅदरिंग, गेट
टुगेदर, न्यु कमर पार्टी यासारख्या अनेक कार्यक्रमात तिने परफोर्म केलं. ग्रुप
डान्स करता करता सोलो डान्स पण करावा तशी संधी मिळावी यासाठी कायमच उत्साही म्हणूनच
तिने आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पुण्याच्या एस. पी. कॉलेज मध्ये प्रवेश
घेतला. १२ वर्षे भरत नाट्यमच शिक्षण घेतलं. नुकतीच तिची 'मांडला दोन घडीचा डाव' ही
मालिका स्टार प्रवाह वर सुरु झाली आहे. तिची नेमकी आवड आणि तिच करीअर यासंदर्भात
जाणून घेण्यासाठी आम्ही तिच्याशी मारलेल्या गप्पा.
|
 |
'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटातून तुझा पहिला ब्रेक तुला कसा मिळाला?
- पुण्याच्या 'सुदर्शन रंगमंच'ला मी नाटक बघायला गेले होते. तिथे
कशावरुन तरी गोंधळ चालू होता. तिथे शुभांगी दामले भेटल्या त्यांनी मला
विचारलं तू सध्या काय करतेस. मी म्हटलं सध्या मी फक्त जिथे डान्स करायची
संधी मिळेल तिचे परफॉर्म करते. त्या मला म्हणाल्या तुझे फोटोस देऊन ठेव.
मी म्हटलं ठिक आहेदेते. आणि मी दिलेच नाही नंतर त्यांचे दोन - तीन फोन
आले. मला म्हणाल्या अगं केदार शिंदे एक चित्रपट बनवतोय रसिका जोशी
लिहितेय. त्यांना तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे. नंतर मग मी केदार शिंदेना
भेटले. त्यांनी मला ऑडिशन न घेता सिलेक्ट केलं. कारण माझ्यात त्यांनी
तेव्हा 'यंदा कर्तव्य आहे' मधली स्वाती पाहिली होती.
तू आतापर्यंत किती चित्रपट आणि मालिका केल्या? |
- 'यंदा कर्तव्य आहे' नंतर मी 'मन्या सज्जना' 'लाडी गोडी', 'चल लवकर'
असे चित्रपट केले.
तसेच 'चारचौघी' ही मालिका केली. 'श्रीमंत पेशवा
बाजीराव मस्तानी' ही मालिका सुरु आहे आणि 'मांडला दोन घडीचा डाव' ही
मालिका नुकतीच स्टार प्रवाह वर सुरु झाली आहे.
'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेत तुझी भूमिका काय आहे?
- यात मी 'अनघा' नावाच्या एका मुलीची भूमिका साकरतेय. अनघा ही एक आदर्श मुलगी आहे.
ती इतर मुलींपेक्षा खुप्प वेगळी आहे. प्रत्येक सिच्युएशन ती अगदी व्यवस्थितपणे
हाताळते. ती खूप मॅच्युअर आहे. खूप समजुतदार आहे. तिच्या वयाच्या प्रत्येकासाठी ती
एक आदर्श आहे. अनघा जो निर्णय घेईल तो योग्यच आहे अशी सगळ्यांचीच खात्री आहे. तिला
एक लहान बहिण आहे. जी अनघाच्या एक्साक्ट अपोसिट आहे. तिचा ट्रॅक वेगळा आहे. ती थोडी
लाडात वाढली आहे. आणि तिच्या मनाप्रमाणे वागत असते. आणि अनघा तिच्या चुकांवर
पांघरुण घालते. तिचा हट्ट पुरवते.
मालिकेचे काही एपिसोड पाहून 'आईना' या जुही चावलाच्या हिंदी चित्रपटाची आठवण होते.
- हो, म्हणजे होत असेल कदाचित कारण हि दोन बहिणींची, त्यांच्या नातेसंबंधाची कथा आहे.
मी तिच्यासाठी स्वतःच्या काही गोष्टींचा त्याग करते. तिच्या हट्टासाठी मी इतरांशी
तिच्या बाजूने बोलते. तिला मी खूप सपोर्ट करते तिच्या सुखासाठी मला काही वेळा माझ्या
इच्छा माराव्या लागतात. पण तिला वाचवताना तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी करताना त्या
गोष्टींचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतो आणि या गोष्टीला तुम्ही कुठे रिलेट करु शकता
हे ठरवण्यासाठी तुम्हाला ही मालिका पहावी लगेल.
हो नक्कीच स्मिता हि मालिका तर आम्ही नक्की पाहूच पण या व्यतिरीक्त तू अजून काय
करणार आहेस?
- सध्या तरी मालिका करताना माझी खूप दमछाक होतेय. बाकी काहीच करण्यासाठी वेळ नाही.
पण बघू......कोणती गोष्ट करायची आणि कोणती नाही हे अजून ठरलेल नाही.
तुला नृत्याची पण आवड आहे.
- हो मी १२ वर्षे भरत नाट्यमच शिक्षण घेतलं आहे. नृत्य हा माझा छंद आहे आणि अभिनय
हे प्रोफेशन. मी एक क्लासिकल बॅले सुद्धा डिरेक्ट केला होता. जिथे मला माझं डान्सचं
टॅलेन्ट दाखवायची संधी मिळेल. तिथे मी नक्कीच त्या संधीचा वापर करुन घेईन.
|