| |
| सिनेवार्ता |
|
पालक आणि पाल्य या दोघांसाठी 'चला वेळ काढूया'.
२९ नोव्हेंबर © मराठीमुव्हीवर्ल्ड
|
सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ रेकितज्ञ मोहन गोखले यांनी 'चला वेळ काढूया' या
नाटकाची निर्मिती केली आहे. नोकरी करणारे पालक आणि एकटा असलेला पाल्य या
विषयावर भाष्य करणारे हे नाटक आहे. पालक आणि पाल्य दोघांनाही या नाटकातून संगीत नृत्य
व विनोद यांच्यामार्फत मनोरंजनातून शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन विजय भालेराव यांनी केले आहे. शिल्पा पटवर्धन यांनी यशवंत
देव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आंग्रे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे.
प्रशांत सावंत आणि अनुराधा अष्टिकर हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. पंकज
पेडणेकर, विनायक तळेकर, सतिश शेळके, उमेश के. के. सिद्धेश गुरव, प्रशांत
दाभोळकर, रोशन आतवणकर, गीता बर्वे, मोहन गोखले या कलाकारांच्या यात प्रमुख
भूमिका आहेत. |
 |
|
|
|
|
|
|
|
|